अहमदनगर (ahmednagar) पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण (hate speech) दिल्याप्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे.
कणकवलीच्या आमदाराच्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल मुस्लीम समाजाच्या सदस्यांनी निषेध केला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर श्रीरामपूर आणि तोफखाना पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.
गेल्या महिन्यात इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या हिंदू महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ राणे यांनी रविवारी श्रीरामपूर आणि तोफखाना येथे दोन जाहीर सभांना संबोधित केले.
व्हायरल झालेल्या दोन रॅलींमधील व्हिडिओंमध्ये राणे मुस्लिम समाजातील सदस्यांना रामगिरी महाराजांविरुद्ध काही बोलल्यास मारण्याची धमकी देताना दिसत आहेत. “तुला समजेल त्या भाषेत मी तुला धमकावत आहे. आमच्या रामगिरी महाराजांविरुद्ध काही बोललात तर आम्ही तुमच्या मशिदीत घुसून तुम्हाला एक एक करून मारहाण करू. हे लक्षात ठेवा,” असे नितेश राणे व्हिडिओमध्ये म्हणाले.
राणेंच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. रविवारी अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर मुस्लिमांनी मोठ्या संख्येने गर्दी करून भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी राणेंविरुद्ध दोन एफआयआर नोंदवण्यात आला. येत्या एक-दोन दिवसांत राणेंना पोलिस चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
ट्विटरवर एका पोस्टमध्ये, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवल्याबद्दल राणेंना अटक करण्याची विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
“हे प्रक्षोभक आणि द्वेषपूर्ण भाषण आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जातीय हिंसाचार घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे सोमवारी म्हणाले की, “माझे वक्तव्य म्हणजे एखाद्या कृतीची प्रतिक्रिया होती. माझे विधान हिंदूंना हे आश्वासन देण्यासाठी होते."
गेल्या महिन्यात आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे रामगिरी महाराज यांच्यावरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा