Advertisement

मोदींबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; तरुणाविरोधात गुन्हा दाखल


मोदींबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनिल बाविसजर असे या आरोपीचे नाव आहे. अनिलसह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहेत. या प्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत आहेत.


अश्लील शेरेबाजी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण चांगलेच तापले असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना राजकीय नेत्यांनी पातळी ओलांडली.  त्यात कार्यकर्ते तरी कसे मागे राहतील. सोशल मिडियावर अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करताना अनिल बाविसजर तरुणाने फेसबुकवर अत्यंत खालची पातळी गाठल्याचे पहायला मिळालं. अनिलने पोस्टमध्ये मोदी हे देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या आईवर अश्लील शेरेबाजी केली आहे. तसंच भारतीय जनता पार्टीबाबतही आक्षेपार्ह पोस्ट केली होती. 


भावना दुखावल्या

अनिलची ही पोस्ट कालांतराने अनेकांनी शेअर केली. ही बाब जोगेश्वरीचे भारतीय जनता पार्टीचे अंधेरी विधानसभेचे महामंत्री नितेश तिवारी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठवली. या पोस्टमुळे भावना दुखावल्या गेल्या असून अशा पोस्टमुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वर्तवत नितेश यांनी अंधेरी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. हेही वाचा -

महिलांचे अश्लील फोटो बनवून पैसे उकळणारा अटकेत

तरुणीसोबत अश्लील चॅटिंग पडलं महागात
संबंधित विषय
Advertisement