Advertisement

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला विरोधक आक्रमक


नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला विरोधक आक्रमक
SHARES

मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र मोदी सरकारचा हा नोटाबंदीचा निर्णय कसा फसला, हे दाखवून देण्यासाठी आणि याच्या निषेधार्थ विविध संघटना तसेच राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी आझाद मैदान येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने श्राद्ध घातले.



राष्ट्रवादीनं घातलं श्राद्ध तर काँग्रेस कार्यकर्त्यानी केलं मुंडन -

मुंबईत राष्ट्रवादीतर्फे आझाद मैदानात नोटाबंदीचं वर्षश्राद्ध घालण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे सहभागी झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत नोटाबंदीचा निषेध व्यक्त केला. मुंबई काँग्रेसने संजय निरुपम यांच्या नेतृवताखाली हे मुंडन आंदोलन केले.


150 लोकांचा जीव गेला. त्यांच्यासाठी सरकारने काही केलं नाही. त्या लोकांसाठी ही शोकसभा आहे. मुंडन हे शोक व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत. तर त्यांनी अमित शाह यांच्या मुलाच्या चौकशीची ऑर्डर का नाही दिली. भ्रष्टाचार विरोधी कायदा हा भाजपा विरोधकांसाठी आहे का? ही लढाई आता रस्त्यावर होईल.

- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस


हेही वाचा - 

नोटाबंदीवरून काँग्रेस-भाजपात व्हिडिओ वॉर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा