ओबीसी-कोळी समाजाचा भाजपा- रासप विरोधात लढा

 Mumbai
ओबीसी-कोळी समाजाचा भाजपा- रासप विरोधात लढा
Mumbai  -  

मुंबई - पर्ससीन जाळी विरोधात गेले कित्येक वर्ष मच्छिमार कृती समितीचा संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी पर्ससीन जाळीवर बंदी आणली, तरीही पर्ससीन ट्रॉलर्सने मासेमारी सुरु आहे. यामुळे पांरपारिक मासेमारी धोक्यात आली असून, सुमारे 12 लाख गरीब मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकीवर भाजपा आणि रासपला मतदान न कऱण्याचा निर्णय मच्छिमार कृती समिती आणि ओबीसी समाजाने घेतला आहे.

मासेमारी वाचवण्यासाठी मच्छिमार कृती समिती राज्यपाल सी. विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळातून महादेव जानकर यांची हकालपट्टी करा, या भ्रष्टाचाराबाबत एसआयटी अंतर्गत चौकशी करा अशी मागणी करणार आहे. तसेच कोकणातील सर्व बंदरांवर जानकरांचा पुतळा जाळून कोळी महिला त्या पुतळ्याला बांगड्या भरण्याचा कार्यक्रम करणार असल्याचे अखिल भारतीय मच्छिमार कृती समितीच्या तांडेल यांनी सांगितले.

Loading Comments