Advertisement

महिलेला थप्पड लगावल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी

आता या तिघांवर मनसेकडूनही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

महिलेला थप्पड लगावल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी
SHARES

मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 3 मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आता या तिघांवर मनसेकडूनही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, दक्षिण मुंबईत यापूर्वी एका महिलेला थप्पड मारणाऱ्या विनोद अरगळे या पक्षाच्या कार्यकर्त्याला पदावरून हटवण्यात येणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नांदगावकर म्हणाले, "आम्ही या घटनेत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींचे पद काढून घेऊ. मी आमचे प्रमुख राज ठाकरे यांना आधीच कळवले आहे. आम्ही पीडित महिलेला फोन करून तिचे म्हणणेही ऐकू. अशा प्रकारचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे."

नागपाडा येथे एका 57 वर्षीय महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली तीन मनसे कार्यकर्त्यांना गुरुवारी अटक केली. या महिलेने मनसेच्या कार्यकर्त्यांना तिच्या बंद दुकानाबाहेर भगवान गणेशाचे स्वागत करणारे पार्टी बॅनर लावण्यापासून रोखले.

पोलिसांनी सांगितले की, मनसे कार्यकर्त्यांनी महिलेशी वाद घातला आणि तिला शिवीगाळ आणि चापट मारली. त्याने तिला धक्काबुक्कीही केली, परिणामी ती जमिनीवर पडली.

मात्र मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यानं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा

वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या तीन मनसे कार्यकर्त्यांना अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा