Advertisement

अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्ता यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.

अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्ता यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. सिल्लोड या विधानसभा मतदारसंघातून सत्तार निवडून येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली.  

अखेर शिवसेनेत

सत्तार लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर भाजपा प्रवेशासाठी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गिरीश महाजन यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांच्या भेटीगाठी करूनही त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर शिवसेनेत जाण्याचा मार्ग पत्कारला.

उमेदवारी मिळण्याची शक्यता

काँग्रेसमध्ये असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी होती. परंतु मागील ५ वर्षांपासून शिवसेनेने शेतकरी पीकविमा, कर्जमाफी इ. विषय लावून धरत शेतकऱ्यांसाठी चांगला लढा उभारला. या कामगिरीने प्रेरित होऊन मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.  येत्या काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्याची माझी तयारी असेल, असंही सत्तार म्हणाले.हेही वाचा-

भाजपाने दरवाजे उघडल्यास विरोधकांमध्ये पवारांशिवाय कुणीही उरणार नाही- शहा

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?संबंधित विषय
Advertisement