Advertisement

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं बुधवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन
SHARES
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेत डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं बुधवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा कोरोना अहवाल १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करून ते रुग्णालयातून घरी गेले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. बुधवारी पहाटे २.१५ मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव निलंगा येथे आणले जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व नागपूरात झालं. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या. 

ते १९८५ ते ८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. लातूरचा एक शक्तिशाली सहकारी नेता अशी त्यांची ओळख होती.


हेही वाचा

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा