Advertisement

मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला जबर झटका, तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

वांद्रे पूर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचा सपशेल पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांनी चक्क मंगळवारी भाजपात प्रवेश केला.

मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला जबर झटका, तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश
SHARES

वांद्रे पूर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचा सपशेल पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांनी चक्क मंगळवारी भाजपात (bjp) प्रवेश केला. या प्रवेशामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला जबर झटका दिल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचे निष्ठावंत आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या निधनानंतर २०१५ साली वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर मालवण मतदारसंघात शिवसेनेकडून पराभव चाखणारे नारायण राणे काँग्रेसच्या तिकीटावर पुन्हा उभे राहिले होते.  

राणे यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यात राणे निवडणूक लढवत असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. राणे यांनी सगळी यंत्रणा प्रचारात उतरवूनही तृप्ती सावंत यांनी राणे यांचा १९ हजार ८ मतांनी दणदणीत पराभव केला होता.

हेही वाचा- अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीला विरोध, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात

मातोश्री निवासस्थान वांद्रे पूर्व मतदारसंघात असून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिवंगत बाळा सावंत करत होते. बाळा सावंत हे मातोश्रीचे अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक होते. पोटनिवडणुकीत तृप्ती इतका दणदणीत विजय मिळवून देखील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांना झाल्याने या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले.  

तेव्हापासून तृप्ती सावंत शिवसेनेवर (shiv sena) नाराज होत्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवत तृप्ती सावंत यांना पक्षात सामावून घेत भाजपने मातोश्रीच्या दारातच शिवसेनेला झटका दिला आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तृप्ती सावंत यांचं भाजपात स्वागत केलं. यावेळी नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते.

(former shiv sena mla trupti sawant joins bjp)

हेही वाचा- पोलीस दलाच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप नसेल, नव्या गृहमंत्र्यांचं आश्वासन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा