• शिवस्मारकासाठीच्या कलशाची मुंबईत शोभायात्रा
SHARE

चेंबूर - शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमी-जलपूजन मुंबईच्या अरबी समुद्रात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 36 जिल्ह्यांमधून आलेल्या जल-मातीच्या कलशाची मुंबईतून शोभायात्रा काढण्यात आली. चेंबूर पांजरपोळ इथं या शोभायात्रेचं भाजपाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कलशाचं पूजन करण्यात आलं. या वेळी ढोलताशा पथक आणि शिवकालीन वेशभूषा, लाठीकाठीचे प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमात नाराजीचे भाव दिसले. "हा कार्यक्रम म्हणजे भाजपाचे शक्तीप्रदर्शन आहे," अशी टीका करत मेटे यांनी कार्यक्रम स्थळ सोडलं. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रंगलेली ही शोभायात्रा गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं रवाना झाली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या