Advertisement

'हे' ४ नगरसेवक घेणार आमदारकीची शपथ

मुंबईतून विधानसभेच्या ३६ जागांपैकी ११ जागांवर मुंबई महापालिकेचे नगरसेवक उभे होते. त्यामध्ये शिवसेनेचे ४, भाजपचा १, काँग्रेसचे २, मनसेचा १, अपक्ष १,सपा १ आणि आखिल भारतीय सेनेकडून १ उमेदवार उभे होते.

'हे' ४ नगरसेवक घेणार आमदारकीची शपथ
SHARES

विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिकेतील ११ नगरसेवकांनी आपले नशीब आजमावले. मात्र त्यापैकी फक्त चारच नगरसेवकांना विधानसभेच्या लढाईत बाजी मारता आली आहे. तर अन्य सात नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे रमेश कोरगावकर, दिलीप लांडे, भाजपचे पराग शहा, ‘सपा’चे रईस शेख हे नगरसेवक आमदार झाले आहेत. 

मुंबईतून विधानसघेणारभेच्या ३६ जागांपैकी ११ जागांवर मुंबई महापालिकेचे नगरसेवक उभे होते. त्यामध्ये शिवसेनेचे ४, भाजपचा १, काँग्रेसचे २, मनसेचा १, अपक्ष १, सपा १ आणि आखिल भारतीय सेनेकडून १ उमेदवार होता.  यात शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नगरसेविका राजूल पटेल यांनी अपक्ष फाॅर्म भरला. ज्या नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींना उमेदवारी दिली नाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तर विठ्ठल लोकरे हे नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. लोकरे मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढवत होते.

पक्षाकडून मिळालेल्या अधिकृत उमेदवारांमध्ये शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर (वांद्रे पूर्व), रमेश कोरगावकर (भांडूप पश्चिम), दिलीप लांडे (चांदिवली), मनस’कडून संजय तुर्डे (कलिना), समाजवादीकडून पालिका गटनेते रईस शेख (भिवंडी), अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी (भायखळा), भाजपकडून पराग शहा (घाटकोपर) उभे होते. तर काँग्रेसकडून आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम) आणि जगदीश कुट्टी (अंधेरी पूर्व) यांना उमेदवारी देण्यात आली होती.

या ११ उमेदवरांपैकी चांदीवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे, भांडुप मतदारसंघातून रमेश कोरगावकर, घाटकोपर पूर्व मतदार संघातून भाजपचे पराग शहा, तर भिवंडीतून सपाचे रईस शेख यांनाच विजय मिळवता आला. तर इतर सात नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव झालेल्या उमेदवारांमध्ये मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, राजुल पटेल (अपक्ष), गिता गवळी(आखिल भारतीय सेना), जगदीश कुट्टी (काँग्रेस), आसिफ झकेरिया (काँग्रेस), संजय तुर्डे (मनसे), विठ्ठल लोकरे (शिवसेना) अशी या पराभूत झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

पालिकेतील ६ माजी नगरसेवक यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उभे राहिले होते. त्यामध्ये शिवसेनेच्या भायखळा विधानसभेतून माजी नगरसेविका यामिनी जाधव यांनी बाजी मारली. तर काँग्रेसचे सुरेश कोपरकर (भांडूप पश्चिम), अजंता यादव (कांदिवली पूर्व), भाजपचे बंडखोर मुरजी पटेल (अंधेरी), मनसेचे संदीप देशपांडे (माहीम), राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ (विक्रोळी) हे पराभूत झाले आहेत.



हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019: दक्षिण मुंबईत युतीचं वर्चस्व

शिवसेनेचे 'हे' उमेदवार केवळ ४०९ मतांनी विजय




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा