Advertisement

गांधी जयंतीपासून भाजपची राज्यभर पदयात्रा

२ ऑक्टोबरपासून पदयात्रेला सुरू होऊन ३० जानेवारीला समारोप होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदयात्रेची जबाबदारी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपवली आहे.

गांधी जयंतीपासून भाजपची राज्यभर पदयात्रा
SHARES

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून भाजपा राज्यभर पदयात्रेचं अायोजन करणार अाहे. ही पदयात्रा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपर्यंत चालू असणार अाहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  समाजातल्या सर्व घटकांना आकर्षित करण्याच्या हेतूने भाजपने गांधी जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आखला आहे.


सुरेश हाळवणकर यांच्यावर जबाबदारी 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान असल्याचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर आता गांधी जयंतीपासून भाजपकडून  पदयात्रा काढण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली अाहे. बुधवारी अाणि गुरूवारी मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून बैठकीत लोकसभा निवडणुकीला समोर ठेऊन कार्यक्रम आखण्यात येत आहे.  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदयात्रेची जबाबदारी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर सोपवली आहे.


३० जानेवारीला समारोप

२ ऑक्टोबरपासून पदयात्रेला सुरू होऊन ३० जानेवारीला समारोप होणार आहे. अनुसूचित जाती -जमाती आणि आदिवासी यांच्या समुदायात संपर्क वाढवण्यासाठी भाजपाकडून विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.  खासदार अमर साबळे यांच्यावर २६ नोव्हेंबर ते महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित स्थळी अर्थात इंदू मिलमध्ये श्रमदानाचा कार्यक्रम आखण्याची जबाबदारी सोपवण्यात अाली अाहे.  याबाबत खासदार अमर साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला अाहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.  


महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून महात्मा गांधी सेवा स्वच्छता संवाद पदायात्रेचं आयोजन केलं आहे. २८८ विधानसभा मतदारसंघात ही यात्रा पोहचणार आहे. या यात्रेत ७५ पुरूष अाणि ७५ महिला असणार आहेत. स्वच्छता आणि संवादाच्या माध्यमातून गांधींजींचे विचार सर्वांपर्यंत पोहचवणे ही यामागील भावना आहे.
- सुरेश हाळवणकर, अामदार



हेही वाचा -

स्वयंघोषित समन्वयांना धडा शिकवू, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा

मुख्यमंत्र्यांकडून ६ मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा