Advertisement

स्वयंघोषित समन्वयांना धडा शिकवू, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा

मराठा क्रांती मोर्चा ही एक चळवळ आहे, परंतु काही स्वयंघोषित समन्वयक राजकीय दावणीला बांधले गेल्याने समाजाच्या नावावर पक्ष काढून मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा दावा त्यांनी केला.

स्वयंघोषित समन्वयांना धडा शिकवू, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा
SHARES

राज्यातील राजकीय लोकप्रतिनिधींसह त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी 'मराठा क्रांती मोर्चाच्या' नावाचा गैरवापर करू नये अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा 'मराठा क्रांती ठोक मोर्चा'ने मंगळवारी मुंबईत दिला. कुठल्याही राजकीय नेत्यांनी यापुढे मराठा क्रांती मोर्चा आणि त्यांच्या समन्वयकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असाही इशारा मोर्चाचे आबासाहेब पाटील, रमेश केरेपाटील यांनी मुंबई मराठा पत्रकार संघात परिषदेत दिला.

मराठा क्रांती मोर्चा ही एक चळवळ आहे, परंतु काही स्वयंघोषित समन्वयक राजकीय दावणीला बांधले गेल्याने समाजाच्या नावावर पक्ष काढून मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा दावा त्यांनी केला.


समन्वयकांची नेमणूक

मराठा क्रांती ठोक मोर्चाची तुळजापूर इथं राज्यव्यापी बैठक घेतल्यानंतर एक राज्यव्यापी समिती तयार केली जाणार आहे. त्यात जिल्हा, तालुकानिहाय समन्वयक नेमले जाणार आहेत. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक संस्थाचालक पूर्ण शुल्क वसूल करत आहेत. याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने पाऊल उचलल्यास त्याला सरकार आणि संबंधित संस्थाचालक जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


सरकारने समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक घोषणा केल्या असल्या, तरी त्याची ते अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे समाजात मोठया प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यासाठी ३४ ते ४० हजार रुपये देण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यासाठी सरकार आणखी किती वेळ घेणार आहे.
- आबासाहेब पाटील, मराठा क्रांती मोर्चा



हेही वाचा-

मराठा आरक्षण: मागासवर्ग अायोग १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करणार अंतिम अहवाल

सरकार आंदोलकांमध्ये फूट पाडतंय - धनंजय मुंडे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा