Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून ६ मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती!

आढावा बैठकीच्या वेळी संबंधित खात्यांचे राज्यमंत्रीही हजर होते. प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना आपल्या कारकिर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्वाचे निर्णय घेतले याची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांकडून ६ मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती!
SHARES

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार ६ मंत्र्यांच्या गेल्या ४ वर्षांतील कामगिरीची झाडाझडती मुख्यमंत्र्यांनी घेतली.


कुठल्या मंत्र्यांचा समावेश?

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या गेल्या ४ वर्षांतील कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.


महत्त्वाचे निर्णय कोणते?

तसंच या आढावा बैठकीच्या वेळी संबंधित खात्यांचे राज्यमंत्रीही हजर होते. प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना आपल्या कारकिर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्वाचे निर्णय घेतले याची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं. आढावा बैठकीत मंत्री आणि संबंधित राज्यमंत्र्यांना वेगवेगळं बोलवण्यात आल्याचं समजतं. उर्वरित मंत्र्यांच्या कामाचा आढावा येत्या २८ तारखेला घेण्यात येणार आहे.



हेही वाचा-

शरद पवार खोटारडे- प्रकाश आंबेडकर

'आयुष्यमान भारत योजना' म्हणजे गरिबांची थट्टा- अशोक चव्हाण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा