Advertisement

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर मोठी कारवाई

आंदोलनापूर्वी त्यांच्या बंगल्याची पाहणी करण्यात आल्याचं सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीत निष्पन्न झालं आहे.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर मोठी कारवाई
SHARES

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला चढवला होता. यावेळी त्यांच्या घरावर चप्पलफेक करत शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गावदेवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर (Senior Police Inspector Rajbhar) यांना थेट निलंबीत करण्यात आलंय. आंदोलनानंतर साऊथ मुंबई कंट्रोल रुमला त्यांची बदली केली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शरद पवार यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक येथील एसटी कर्मचारी आंदोलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. गृहमंत्र्यांकडे सादर अहवालानंतर दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. या झोनचे डीसीपी योगश कुमार यांना विश्वास नांगरे पाटील यांनी शनिवारीच हटवले होते. त्यांच्या ठिकाणी डीसीपी निलोत्पल यांना चार्ज देण्यात आला होता.

दरम्यान, आंदोलनापूर्वी त्यांच्या बंगल्याची पाहणी करण्यात आल्याचं सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीत निष्पन्न झालं आहे. त्यानुसार चार आंदोलनकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी कट रचल्याप्रकरणी आझाद मैदानातून शनिवारी रात्री अटक केली.

या प्रकरणामध्ये आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये न्यायालयानं १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिवसेनेने या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीची फूस असल्याचा आरोप केलाय. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपा पाठिंबा असल्याचा आरोप करत शिवसेनेनं विरोधी पक्षावर हल्लाबोल केलाय.

आझाद मैदान इथून शुक्रवारी सकाळपासूनच एक.दोन करून आंदोलनकर्ते बाहेर पडायला सुरुवात झाली. त्यांनी सर्वानी वेगवेगळा प्रवास करून पवार यांचे निवासस्थानाचा परिसर गाठला. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे होते. त्यानंतर तेथील बागेत एकत्र जमल्यानंतर सर्वानी सिल्व्हर ओकच्या दिशेने येऊन आक्रमक आंदोलन केले.हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागील सूत्रधार कोण? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

एसटी कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा