अभासेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

Agripada
अभासेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात
अभासेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात
अभासेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात
See all
मुंबई  -  

भायखळा - आग्रीपाडा येथे रविवारी सायंकाळी अखिल भारतीय सेनेच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे आशा गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 212 (जुना 205 ) मधून अभासेच्या नगरसेविका गीता गवळी या सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तिसऱ्यांदाही महानगरपालिकेची निवडणूक जिकंण्यासाठी अभासेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कार्यालय उद् घाटनाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून अभासेच्या नगरसेविका गीता गवळी आणि वंदना गवळी या चांगल्याच कामाला लागल्या आहेत. सध्या अभासेच्या नगरसेविका आपआपल्या प्रभागात निरनिराळे उपक्रम राबवताना दिसत आहे. त्याचसोबत स्थानिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.