मुलुंडच्या नानेपाडात तांदुळ वाटप

 Dalmia Estate
मुलुंडच्या नानेपाडात तांदुळ वाटप
मुलुंडच्या नानेपाडात तांदुळ वाटप
See all

मुलुंड - नानेपाडा परिसरातल्या रहिवाशांसाठी गुरुवारी भाजपाचे आमदार सरदार तारासिंग यांच्या हस्ते तांदूळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिका धारकांना 2 रुपये प्रतिकिलो दराने तांदळाचं वितरण केलं गेलं. या सुविधेचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. 'गोरगरिबांसाठी सतत काम करेन अनेक सुविधा मिळवून देणार' अशा भावना भाजपा आमदार तारासिंग यांनी व्यक्त केली. 'निवडणुका आल्या म्हणून मी तांदूळ वाटत नाहीये' असाही टोला हाणून तारासिंग यांनी गर्दीच्या टाळ्या मिळवल्या. या महागाईच्या काळात हे असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत असं मतही उपास्थित नागरिकांनी व्यक्त केलं.

Loading Comments