'टॅब' करा 'ग्रॅब'

  Mumbai
  'टॅब' करा 'ग्रॅब'
  मुंबई  -  

  मुंबई - विधानभवन परिसरात ऐटीत प्रवेश करणाऱ्या आमदार महोदयांसोबत असलेल्या लवाजम्यापैकी क्वचितच कोणाकडे फाइल पहायला मिळेल. किंबहुना आमदार किंवा त्यांच्या स्विय सहायकाला फाइलींचा बोझा उचलावा लागू नये, अशी तजवीज लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्रातले आमदार आता हायटेक होणार आहेत. डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकण्याची पहिली संधी वरच्या सभागृहातल्या म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं कामकाज पेपरलेस होणार आहे. सर्व आमदारांच्या दिमतीला अद्ययावत टॅब दिले जाणार आहेत. ‘टॅब’ आधी ‘ग्रॅब’ करण्याची संधी ज्येष्ठांच्या सभागृहातल्या म्हणजे विधान परिषदेतल्या सदस्यांना मिळणार आहे. 

  “विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात विधान परिषदेच्या सर्व सदस्यांकडे टॅब उपलब्ध झालेले असतील. त्यादृष्टीने सभागृहात आवश्यक तांत्रिक बाबींच्या पूर्ततेला सुरुवात झालेली आहे.” ही माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना दिली आहे. विधानसभेतल्या आमदारांना मात्र टॅब मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विधानसभा सदस्यांनाही अद्ययावत टॅब उपलब्ध करुन दिले जातील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.