Advertisement

भाजप हायकमांड करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा- गिरीश महाजन

महायुतीतील तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.

भाजप हायकमांड करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा- गिरीश महाजन
SHARES

शिवसेनेला ५०-५० फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं नव्हतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलं होतं. त्यामुळे शिवसेनेने भाजपाबरोबर सायंकाळी होणारी बैठक रद्द केली. या सर्व घडामोडींमुळे महायुतीचं सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचेच सरकार स्थापन होईल. तसंच भाजपा आणि शिवसेनेतील वितुष्ट  दोन-तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला. भाजपाची विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बुधवारी बैठक होत आहे. या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीतल हायकमांड पुढील रणनीती ठरवतील. यामध्ये दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असेल, असं महाजन म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं. सरकार स्थापनेबाबतच्या चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. निकाल लागल्यानंतर फार काळ गेला नाही याकडंही महाजन यांनी लक्ष वेधलं आहे.



हेही वाचा -

आम्ही विरोधी पक्षाचीच भूमिका बजावणार - जयंत पाटील

महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा