सर्व फेरीवाल्यांना परवाने द्या – संजय निरुपम

 Fort
सर्व फेरीवाल्यांना परवाने द्या  – संजय निरुपम
Fort, Mumbai  -  

सीएसटी - मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत फेरीवाल्यांबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर केला. मात्र हा निर्णय शिवसेनेच्या दबावाखाली घेतला असून तो चुकीचा असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

टाऊन वेंडिंग कमिटीची रचना मुंबई शहर आणि महापालिकेच्या वॉर्ड स्तरावर करण्यात यावी. सर्व फेरीवाल्यांना परवाने द्या. या मागण्या पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे केल्या. मुंबईत सव्वा कोटी नागरिक असताना सव्वा तीन लाख फेरीवाले सामावून घेऊ शकतात. सध्या मुंबईत जवळपास सव्वा दोन लाख फेरीवाले आहेत.

पालिकेने आतापर्यंत 1 लाख 20 हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली असल्याचे पालिका आयुक्तांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितल्याची माहिती निरुपम यांनी दिली. भारतीय संसद तर्फे 2014 साली संमत केलेला फेरीवाला कायदा शब्दश: लागू केला पाहिजे. मात्र मुंबई महापालिकेत अद्याप तो अंमलात आला नसल्याचे निरुपम यांनी म्हटले. हा कायदा लागू होत नाही तोपर्यंत फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये बदलीचे वारे सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक नियाज अहमद वनू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली.

धर्माच्या नावावर मते मागितल्यास तो गुन्हा आहे असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला अाहे. अाम्ही त्याचे स्वागत करतो. या निर्णयाचे पालन सर्वांनी केले पाहिजे असे निरुपम यांनी सांगितले.

Loading Comments