Advertisement

‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते रणजीत डिसले कोरोना पॉझिटिव्ह

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सर्वांच्या कौतुकास पात्र झालेले शिक्षक रणजीत डिसले यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे.

‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते रणजीत डिसले कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सर्वांच्या कौतुकास पात्र झालेले शिक्षक रणजीत डिसले यांची कोरोना टेस्ट (covid19) पाॅझिटिव्ह आली आहे. स्वत: डिसले यांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे डिसले यांचा मुख्यमंत्र्यांपासून ते राज्यपालांपर्यंत अनेक नामवंतांच्या हस्ते गौरव झाल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.

लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करून घेतली असून ती पाॅझिटिव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन रणजीत सिंह डिसले यांनी केलं आहे. 

रणजीत सिंह डिसले यांचा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्याआधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी डिसले यांच्या स्वत: घरी जाऊन डिसले यांचा सत्कार केला होता.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार

पाठोपाठ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर डिसले यांनी कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची देखील भेट घेतली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच आता कोविड टेस्ट करून घ्यावी लागणार आहे.

सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले सरांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

(global teacher award winner ranjit singh disle tested covid 19 positive)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा