जून्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटना एकत्र

 Mumbai
जून्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटना एकत्र

सीएसटी - जून्या पेन्शन योजनेसाठी आझाद मैदानात सर्व राज्य कर्मचारी संघटनांनी गुरुवारी आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाने जूनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. नवीन अंशकालीन पेन्शन योजना राज्यात 2005 पासून लागू करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी असी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

"नवीन पेन्शन योजनेच्या विरोधात सतत आंदोलन करूनही राज्य सरकारला जाग आली नाही. नवीन पेन्शन योजने अंतर्गत पगार कपात केली जात आहे. मात्र त्याचा हिशेब शासन देत नाही. कर्मचाऱ्यांचे करोडो रुपये शेअर बाजारात गुंतवले जात आहेत," असा आरोप राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी केला आहे. जूनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, उग्र आंदोलन केले जाईल असाही इशारा दिला.

Loading Comments