Advertisement

Coronavirus update: कोरोनामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर, निवडणूक आयोगाचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राज्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुका पुढं ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Coronavirus update: कोरोनामुळे महापालिका निवडणुका लांबणीवर, निवडणूक आयोगाचा निर्णय
SHARES

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढं ढकला अशी मागणी राजकीय नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीला प्रतिसाद देत आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राज्यातील ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुका पुढं ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी दिली.

हेही वाचा- Corona Virus: नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ६ महिने पुढं ढकला - जितेंद्र आव्हाड 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (state housing minister jitendra awhad) यांनी निवडणूक आयोगाला (election commission) रितसर पत्र लिहून नवी मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. नवी मुंबई महापालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होणार होती. या निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. तर, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (aurangabad municipal corporation election 2020) देखील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ६ महिने पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे. निवडणूक पुढे ढकलताना महापालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून केली होती. 

तर, राज्यातील १९  जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या (grampanchyat election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होतं. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या (nmmc election) सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या; तसंच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असंही राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान  (state election commissionar ups madan) यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- कोरोनाचा कहर - LIVE UPDATES


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा