'हृदय उपचारासाठी मुंबईत दोन नवीन सेंटर उभारणार'

  Mumbai
  'हृदय उपचारासाठी मुंबईत दोन नवीन सेंटर उभारणार'
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकार हृदयावरील उपचार आणि औषोधोपचार दर कमी करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी दिली. 2015 च्या आकडेवारी नुसार 6.17 करोड लोकांना हृद्यासंबंधी विविध समस्या असून, प्रत्येक वर्षी 5 लाख रुग्ण ह्रदयाची सर्जरी करून घेतात. मात्र यासाठी लागणारी उपचार पद्धती खूप खर्चिक असते. त्यामुळे मुंबई भाजपा येत्या काळात दोन ह्दय उपचार केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका हार्ट स्टेन्टसाठी रुग्णांना 35 ते 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर चर्चा केल्यानंतर यात 85 टक्के दर कमी करून 7 हजार 260 रुपयांमध्ये रुग्णांना स्टेन्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच रक्ताभिसरण करणारी स्टेन्टची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे. याची किंमत देखील 85 टक्के कमी करून 29 हजार 640 रुपये इतक्या कमी दरात भारतातील सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर औषधाच्या किंमतीत 50 टक्के दर कमी करणार असून, 3 हजार जनऔषधी केंद्र सुरू करणार अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.