हिवाळी अधिवेशनात हल्ल्याचा कट

  Vidhan Bhavan
  हिवाळी अधिवेशनात हल्ल्याचा कट
  हिवाळी अधिवेशनात हल्ल्याचा कट
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार विधीमंडऴ परिसरात वाहन पार्किंगचे नियम बदलण्यात आले आहेत, त्यानुसार कुठल्याही मंत्र्यांच्या वाहनांना विधिमंडळ परिसरात प्रवेश आणि पार्किंग करता येणार नाहीये, हा नियम अगदी मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही लागू असणार आहे. दहशतवादी ह्ल्ल्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिलीये.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.