Advertisement

'पोंगल'च्या उत्सवातून राजकीय प्रचार


'पोंगल'च्या उत्सवातून राजकीय प्रचार
SHARES

धारावी - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांची प्रचारासाठीची बॅनरबाजी आणि झेंड्यांचे फंडे सध्या थंड झाले आहेत. परिस्थिती काहीही असो मात्र पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे हे राजकीय नेत्यांना चांगलेच माहित असल्याने धारावीतील 90 फिट रस्त्यावर 'पोंगल' या सामूहिक उत्सवाचे आयोजन शनिवारी हिंदू युवा सेनेच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरएसएसचे कोकण प्रांत प्रचारक अभिजित गोखले, व्हीएचपीचे कोकण प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, तामिळनाडूचे वरिष्ठ पत्रकार नम्बी नारायणन, शिवसेना उपविभाग प्रमुख मुत्तू तेवर, युवासेना विभागप्रमुख प्रवीण जैन, शाखाप्रमुख वसंत नकाशे, गुजरात संपर्क प्रमुख कमलेश वारिया, भाजपा धारावी अध्यक्ष मणी बालन, धाराव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर याना आमंत्रित करण्यात आले होते.
धारावीत धर्मान्तराचा मुद्दा चांगलाच चर्चेत असताना परधर्मियांचे हिंदूंवरील धर्मांतरचे आक्रमण थोपविण्यासाठी हिंदू युवा सेना गेल्या 10 वर्षांपासून सामूहिकरीत्या 'पोंगल'चे आयोजन धारावीमध्ये करते. यंदा या उत्सवात तामिळ भाषिकांसह मराठी भाषिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हा उत्सव साजरा करण्यासाठी साधारण 2 हजार चुली प्रसादासाठी पेटविण्यात आल्या होत्या. हा अविस्मरणीय सोहळा नजरेत टिपण्यासाठी विदेशी पाहुण्यासहीत स्थानिकांनी एकच गर्दी केली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा