शिवसेनेचं हिंदुत्व धर्मनिरपेक्ष, प्रबोधनकारांचा वारसा चालवणारं- जोगेंद्र कवाडे

शिवसेनेचं हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचं मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जागेंद्र कवाडे यांनी व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

SHARE

हेही वाचा- मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. या आघाडीत कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षही सहभागी आहे. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, कवाडे म्हणाले, भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्ववादात कमालीचा फरक आहे. भाजपचं हिंदुत्व हे मनुवादी आहे. मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारतं. तर, शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचंही ते म्हणाले. 

हेही वाचा- ‘जाणता राजा’ एकच, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेल्या वादात शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं? असा प्रश्न भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात, असं वक्तव्य कवाडे यांनी केलं.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या