Advertisement

University Exams 2020: विद्यार्थ्यांचं आरोग्य, भविष्याचा विचार करूनच परीक्षा रद्द- उदय सामंत

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करूनच राज्य सरकारने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

University Exams 2020: विद्यार्थ्यांचं आरोग्य, भविष्याचा विचार करूनच परीक्षा रद्द- उदय सामंत
SHARES

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करूनच राज्य सरकारने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठलंही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत (holding university final year exams not feasible says maharashtra minister uday samant ) नाही, अशी शिफारस राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीने केल्यावर ही शिफारस केंद्रबिंदू मानूनच हा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला. 

राज्य सरकारची परीक्षा न घेण्यामागची भूमिका समजावून सांगण्यासाठी उदय सामंत यांनी मुंबईत गुरूवार ९ जुलै रोजी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींच्या आधारेच सरकारने निर्णय घेतल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - University Exams 2020 : विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

समितीची स्थापना

या पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी सांगितलं की, ६ एप्रिल २०२० रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची पहिली बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय राज्य समिती स्थापना करण्यात आली. २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना आल्या. त्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीत राज्य शासनाने निर्णय घ्यावा आणि विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात असं सांगण्यात आलं होतं.

यूजीसीला पत्र

राज्य समितीने ६ मे २०२० रोजी आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानंतर राज्यपालांशी चर्चा करून शासनाने हा अहवाल स्वीकारला. त्यानुसार विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत १७ मे २०२० रोजी विद्यापीठ अनुदान आयोगा  (यूजीसी) ला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

सरासरी गुण

‌एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी केली आहे. सरासरी गुण देऊनही जर एटीकेटीचा विद्यार्थी उत्तीर्ण होणार नसेल तर त्याला विशेष सवलत म्हणून ग्रेस मार्क देण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. राज्य सरकार यासंदर्भात कुलगुरूंशी चर्चा करत आहेत, अशी माहिती देखील उदय सामंत यांनी दिली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा