निरुपमांच्या पत्नीला देशात वाटतं असुरक्षित


SHARE

मुंबई - सर्जिकल स्ट्राइकच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पत्नीला या देशात राहताना असुरक्षित वाटतंय. निरुमप यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडिया आणी फोनवरून धमक्या येत असून, त्यामुळे येथे राहणं आपल्यासाठी असुरक्षित बनल्याचं गीता निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलं आहे. "सोशल मीडियामधून शिवीगाळ करण्यात येत आहे. त्यामुळे आमीर खानची पत्नी किरण राव हिच्याप्रमाणेच मलालाही या देशात राहणं असुरक्षित वाटतं आहे. निरुपम जे काही

बोलले त्याबाबत चर्चा होऊ शकते. पण या वादात माझ्या सासूलाही ओढले जातंय", असं गीता निरुपम यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच या पत्राला पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, असं आवाहनही केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या