Advertisement

मी तर अॅक्सीडेंटल पाॅलिटीशियन- मनोज तिवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासात भरारी घेतली आहे. उत्तर भारतीयांची पसंती नरेंद्र मोदी यांनाच असून, एकही मत दुसऱ्या पक्षाला जाणार नाही, असा विश्वास भाजपाचे खासदार आणि प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी व्यक्त केला.

मी तर अॅक्सीडेंटल पाॅलिटीशियन- मनोज तिवारी
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासात भरारी घेतली आहे. उत्तर भारतीयांची पसंती नरेंद्र मोदी यांनाच असून, एकही मत दुसऱ्या पक्षाला जाणार नाही, असा विश्वास भाजपाचे खासदार आणि प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी व्यक्त केला. गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर गुजरातचा लौकिक वाढला.  नरेंद्र मोदींना पुन्हा संधी दिल्यास जागतिक महासत्तेकडे भारताची वाटचाल होईल. तसंच आपण अॅक्सीडेंटल पाॅलिटीशयन असल्याचंही ते म्हणाले. भिवंडीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात खासदार मनोज तिवारी बोलत होते.


अचानक राजकारणात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपण राजकारणात आलो. आपण पारंपरिक राजकारणी नसून, `अॅक्सीडेंटल पॉलिटीशियन' आहोत. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना केलेल्या कार्यामुळे जगभराने गुजरातला नमस्कार करण्यास सुरुवात केली. आपण पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर मोदींना संधी दिल्यास, विकासकामांमुळे देश अव्वल स्थानावर जाईल, असा विश्वास तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून 'चौकीदार चोर है,' अशी घोषणा केली जाते. मात्र, उत्तर भारतीय प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षता दाखवित हजारो किलोमीटरवरुन येऊन आपले काम चोखपणे करीत आहेत. ते चोर आहेत का, असा सवाल तिवारी यांनी केला. राहुल गांधी यांना सर्वांनी २९ एप्रिलच्या मतदानातून धडा शिकवावा, असं आवाहन तिवारी यांनी केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहे. आता एक गोळी जरी चालली, तर बालाकोटपेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशारा तिवारी यांनी दिला.


विकासासाठी कटिबद्ध

उत्तर भारतीयांच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. भिवंडी मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू आहेत. त्यातून या भागाचा कायापालट होण्याबरोबरच लाखो तरुणांना नोकरी मिळेल, असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.


भिवंडीचे आपण चौकीदार

खा. कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आपण भिवंडी शहराचे चौकीदार आहोत, असे प्रतिपादन खासदार मनोज तिवारी यांनी केलं. तसंच आपण दुसऱ्यांदा भिवंडीत आलो असून, भिवंडीतील उत्तर भारतीयांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहू, अशी ग्वाही तिवारी यांनी दिली.
हेही वाचा -

उर्मिला मातोंडकरला हवंय पोलिस संरक्षण

भाजपा आमदार मंदा म्हात्रेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रारRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा