गगराणी, खरगे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

सनदी अधिकारी भूषण गगराणी आणि विकास खरगे यांची मुख्यमंत्री ​उद्धव ठाकरे​​​ यांचे प्रधान सचिव या पदावर नियुक्ती झाली आहे.

SHARE

सनदी अधिकारी भूषण गगराणी आणि विकास खरगे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव या पदावर नियुक्ती झाली आहे. 

भूषण गगराणी यांनी याआधी नारायण राणे, विलासराव देशमुख तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे. गगराणी हे १९९०च्या तुकडीचे आयएएस आहेत. ते मराठी हा मुख्य विषय घेऊन आयएएस झालेले आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला गती दिली.

हेही वाचा- मी झोपेतही ‘हे’ बडबडायचो..., राऊत यांनी सांगितला मजेशीर अनुभव

तर महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे हे १९९४ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. याआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलं आहे. 

डॉ. विनायक निपुण यांची नगरपालिका प्रशासन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 'उडान' योजनेची अंमलबजावणी व राज्याला हवाई हब करण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MTDC) संचालकपदी सचिन कुर्वे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कुर्वे यांनी याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम केलं आहे. 

हेही वाचा- मंत्रीमंडळात ज्येष्ठ नेते हवेत, अशोक चव्हाण यांची अपेक्षा

ए. ई. रायते यांची विक्री कर विभागात सह आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अमोल येडगे यांची अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या