चेंबूरमध्ये अनधिकृत बॅनरबाजी


SHARE

चेंबूर - बॅनरबाजांवर कडक कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहेत. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून चेंबूर परिसरात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले असून, बॅनरबाजांवर कारवाई व्हावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

गणेशोत्सव काळात सर्वांकडून बॅनरबाजी करण्यात येते. पूर्वी काही राजकीय पक्षाचेंच बॅनर दिसत होते. आता दुकानदार, क्लासेस, आणि अनेक पतपेढीनी देखील अनधिकृत बॅनरबाजी केली आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असल्याने शहरात बॅनरबाजी वाढतच आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या