Advertisement

झेड प्लस सुरक्षा असूनही शरद पवारांच्या घरावर हल्ला कसा? धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांच्या कन्या आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

झेड प्लस सुरक्षा असूनही शरद पवारांच्या घरावर हल्ला कसा? धक्कादायक माहिती उघड
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांच्या कन्या आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आणि आझाद मैदानावरील त्यांचे आंदोलन पाहता, राज्य गुप्तचर विभागानं गेल्या तीन महिन्यांपासून सतर्कतेचा इशारा दिला होता. पवार यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना केली होती. त्यात विशेषत: झोन II चे DCP योगेश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणारी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी अशी सूचना केली होती. मात्र, पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसल्याचं शुक्रवारच्या आंदोलनानंतर उघड झालं. चौकशी समिती या पैलूकडे लक्ष देईल.”

योगायोगानं, अधिकाऱ्यानं सांगितलं की, वाहतूक मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.

शनिवारी झालेल्या बैठकांत अधिकाऱ्यानं सांगितलं की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख झेड प्लस सुरक्षा कवच घेत असतानाही पवारांच्या निवासस्थानावर अशी त्वरीत कारवाई करण्यात आली नाही.

याशिवाय, आझाद मैदान आणि गावदेवी पोलिसांना टेलिव्हिजन वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि व्हिडिओग्राफर सोबत असताना १०० हून अधिक आंदोलकांच्या जमावाची माहिती कशी नव्हती याचीही चौकशी समिती करेल. पुढे, हे पॅनेल वकील-सह-नेते गुणरत्न सदावर्ते यांच्या आंदोलकांना चिथावणी देण्याच्या भूमिकेची आणि कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करण्यात आले याची देखील चौकशी करेल. आंदोलकांपैकी काही स्त्री-पुरुष दारूच्या नशेत होते, अशीही माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशी अगोदरच स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असं सांगितले. त्यांनी एमएसआरटीसी कर्मचार्‍यांना शांतता राखण्याचे आणि त्यांच्या कृतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. “चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल,” त्यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं.

पुढे त्यांनी पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि घटनेनंतरच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वळसे पाटील आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.



हेही वाचा

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांवर मोठी कारवाई

एसटी महामंडळ १०९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा