Advertisement

जनसंघर्षाचं वादळ भाजपची सत्ता उलथवेल - मल्लिकार्जुन खर्गे

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात समाजसुधारकांच्या हत्या करणारे मोकाट आहेत. सरकारी यंत्रणेकडून पुरोगामी विचारांच्या लोकांच्या मानवी हक्कांचे हनन सुरु आहे.

जनसंघर्षाचं वादळ भाजपची सत्ता उलथवेल - मल्लिकार्जुन खर्गे
SHARES

देशात दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना सरकार संरक्षण देत आहे. त्यामुळेच अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या अत्याचारी व हुकुमशाही सरकारविरोधात जनसंघर्षाचं वादळ सुरु झाले असून हे वादळ भाजपची सत्ता उधळवून लावेल, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.



विरोधात बोलणाऱ्यांवर दडपशाही

 भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात समाजसुधारकांच्या हत्या करणारे मोकाट आहेत. सरकारी यंत्रणेकडून पुरोगामी विचारांच्या लोकांच्या मानवी हक्कांचे हनन सुरु आहे.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर दडपशाही केली जात आहे. त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. काँग्रेस पक्षाने देशात जातीयवाद, धर्मांधता पसरवणाऱ्या या विचारधारेचा नेहमीच विरोध केला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तिरंग्याला राष्ट्रध्वज मानले नाही, ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला खर्गे यांनी लगावला.


घोटाळेबाजांना संरक्षण

नरेंद्र मोदी “ना खाऊंगा ना खाने दूंगा” अशी थाप मारून सत्तेवर आले. पण मोदींच्या सत्ताकाळात बँकांचे घोटाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घोटाळेबाजांना सरकारचं संरक्षण आहे असं दिसत आहे. राफेल विमान खरेदी, गुजरात स्टेट गॅस कॉर्पोरेशनमधील हजारो कोटींचा घोटाळा असो, मॉब लिंचिंगच्या घटना असो वा दलित अत्याचारांच्या घटना असो. जाहीर सभांमधून लांबलचक भाषणे देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर संसदेत बोलत नाहीत, अशा शब्दात खर्गे यांनी पंतप्रधानांवर टीका केली.


राज्यभर संघर्ष यात्रा 

राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आयोजीत केली अाहे.  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरातून अंबाबाईचा आशिर्वाद घेऊन ३१ ऑगस्ट रोजी या जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ होईल. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती कऱण्यात येणार असून काँग्रेस पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवली जातील. या जनसंघर्ष यात्रेत राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते सहभागी होणार असल्याचे खा. अशोक चव्हाण म्हणाले.



हेही वाचा -

सागरी सेतूचे बांधकाम १ महिन्याच्या अात सुरू करा - मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा