Advertisement

IT छापेमारीवर आदित्य म्हणाले, “महाराष्ट्र झुकणार नाही”

शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापुर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

IT छापेमारीवर आदित्य म्हणाले, “महाराष्ट्र झुकणार नाही”
SHARES

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केली. पुण्यात सहा ठिकाणी सीबाआयनेही छापेमारी केली. छापेमारी झालेल्यात पर्यावरण मंत्री व युवासेनेचे पदाधिकारी राहूल कनाल, शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांचाही समावेश आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला.

आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीला सुरूवात केली. शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापुर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह जवळपास ५० ठिकाणी हे छापे टाकले. २५ निवासस्थानं आणि १५ कार्यालयांची तपासणी केली. मुंबईतील एका हॉटेल्सच्या काही सुट्सवरही छापे टाकण्यात आले.

महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, बेंगळुरू इथंही आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. यामध्ये सुमारे ५० घरांवर छापे टाकण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापैकी काही छाप्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आयकरच्या छाप्यांवर अजित पवार म्हणाले, आपल्याशी संबंधित लोकांना त्रास दिला जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकावर छापा टाकण्यात आला. हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. केवळ माझ्याशी संबंध असल्याने त्यांचा छळ केला जात आहे. शरद पवारांनाही असाच त्रास दिला गेला.

महाराष्ट्रावर हे तर दिल्लीतील आक्रमण आहे. महाविकास आघाडीची केंद्र सरकारला भीती वाटायला लागली असून युपी, पंजाब, बंगालमध्येही केंद्र सरकारने हेच केले. पण महाराष्ट्र थांबणार नाही अशी प्रतिक्रीया आदीत्य ठाकरे यांनी दिली.



हेही वाचा

दादरच्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’

ED विरोधात शिवसेना खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा