आता अॅपद्वारे अर्ज करा...

 Mumbai
आता अॅपद्वारे अर्ज करा...
आता अॅपद्वारे अर्ज करा...
See all

हज हाऊस- हजला जाण्यासाठी व अर्जभरण्यासाठी लवकरच एक मोबाईल अप्लिकेशन सुरु करणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नाखवी यांनी दिली. हज हाऊस येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अॅपद्वारे अर्ज भरता येणार आहे. हज, मक्का-मदिनाला जाताना काय करावे, काय करू नये यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती नाखवी यांनी दिली.

दरम्यान त्यांनी हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यात आलं ही स्वागतार्ह बाब आहे. हा निर्णय कमिटीने यापूर्वीच घेणे गरजेचे होतं असं मत त्यांनी मांडलं. त्याचप्रमाणे ट्रिपल तलाकसाठी कॉमन सिव्हिल कोर्टला ढाल बनवणे उचित नाही. शासन यावर कोणताही निर्णय घेईल तो सर्वांगीण विचार करून घेईल अशी प्रतिक्रीया अब्बास नाखवी यांनी यावेळी दिली.

Loading Comments