झोल मतांच्या आकडेवारीचा?

    मुंबई  -  

    वरळी -  महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 197 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश पवार यांचा पराभव झाला आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या स्थानिक अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. एकाच वॉर्डमध्ये तीन वेगवेगळी मतांची आकडेवारी कशी दिली जाते असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. विशेष म्हणजे मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटंलोटं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. मनसेचे विजयी उमेदवार दत्ता नरवणकर यांनी आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत प्रकाश पवार यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकाश पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपाची दखल आता निवडणूक आयोग घेतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.