Advertisement

दादांना ताईंनी बांधली राखी


दादांना ताईंनी बांधली राखी
SHARES

रक्षाबंधनाचा उत्साह सगळीकडेच पहायला मिळत आहे. खरेतर हा दिवस भावा बहिणीसाठी खास असतो. आपला भाऊ कितीही लांब असला तरी यादिवशी भाऊ आपल्यासोबत असावा, असे प्रत्येक बहिणीला वाटत असते.


दादा- ताईंचे रक्षाबंधन-

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोमवारी ‘रक्षाबंधन’ साजरा केला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ म्हणतात.

दरम्यान ताईंनी रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे ट्विटही त्यांनी केले आहे. याचसोबत ट्विटरवर काही फोटो देखील शेअर केले आहेत.हेही वाचा -

तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!संबंधित विषय
Advertisement