आयएनएस चेन्नई नौदलाच्या ताफ्यात दाखल !

  मुंबई  -  

  मुंबई - शत्रुला भेदता न येणारी संरचना. अभेद्य. महाकाय. बलाढ्य अशी ही युद्धनौका. विनाशिका म्हणजेच आयएनएस चेन्नई युद्धनौका. शुक्रवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका थाटामाटात सहभागी झाली. कोलकाता क्लासमधील आयएनएस चेन्नई ही शेवटची विनाशिका आहे. या विनाशिकेवर लावण्यात आलेली शस्त्रास्त्र ही शत्रूला पळताभुई करून सोडण्यास सक्षम आहे. मुंबईच्या माझगाव डॉकयार्डमध्ये बनवण्यात आलेल्या या युद्धनौकेत एकावेळी 350 ते 400 सैनिक राहू शकतात. सैनिकांच्या खाण्यापिण्यापासून ते झोपण्यापर्यंतची सगळी सोय या जहाजात करण्यात आलीय.

  युद्धनौकेची खास वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूया

  • भू किंवा जलपृष्ठावर मारा करणारी सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्रं
  • बेरेक 8 लांब पल्ल्याची जमिनीवरून आकाशात मारा करणारी मिसाइल्स
  • रडारपासून अस्तित्व लपवण्याची क्षमता
  • पाणबुडीचा शोध घेणारी सोनार यंत्रणा
  • वैशिष्ट्यपूर्ण रचना
  • विविध पल्ल्यांच्या तोफा
  • पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रं
  • जहाजाच्या मागील बाजूला हेलिपॅड
  • एका वेळी दोन हॅलिकॉप्टरसाठी हँगर्स
  • नौकेवर 40 अधिकारी आणि 350 नौसैनिक असतील कार्यरत
  • 7500 टन वजनाची 164 मीटर लांबीची युद्धनौका
  • निर्मिती खर्च - 4 हजार कोटी रुपये

  चार टर्बाइन्स या विशाल जहाजाला लागणाऱ्या ऊर्जेची पूर्ती करण्यास सक्षम आहेत. अत्याधुनिक शस्त्रसामुग्री आणि बचावाच्या साधनांनी सुसज्ज असलेली ही विनाशिका शत्रूचा विनाश करेल यात शंकाच नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.