काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

  Pali Hill
  काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू
  मुंबई  -  

  बोरीवली - मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेसने महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत जाण्यास नकार दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यापूर्वीच स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच काँग्रेसची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार असल्याचंही काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं. उत्तर मुंबई मतदार संघात निवडणुकीसाठी इच्छुक उमेद्वारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखती मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, प्रवक्ते सचिन सावंत आणि आमदार अस्लम शेख घेत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.