काँग्रेसचे गडच धोक्यात

  Pali Hill
  काँग्रेसचे गडच धोक्यात
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिकेत सध्या शिवसेना भाजपाच्या युतीचीच चर्चा आहे. निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या दृष्टीकोनातून कोणतीही पावले टाकली जात नाही आहेत. परंतु थंड पडलेल्या काँग्रेसमधील विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना, भाजपाची कास पकडल्यामुळे काँग्रेसला आपले जे काही गड आहेत, ते राखता येतील का हाच मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  मुंबई महापालिकेत काँग्रेसचे सध्या 52 नगरसेवक आहेत. कांदिवली, मालाड, मालवणी, अंधेरी पश्चिम, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, कुलाबा, मस्जिद, दादर- नायगाव, वडाळा, अँटॉप हिल, मानखुर्द, आदी भागांमध्ये काँगेसचे प्राबल्य आहे. परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. त्यामुळे काँग्रेसचे कांदिवलीचे नगरसेवक सागरसिंह ठाकूर, अंधेरीतील पूर्व मधील केशरबेन पटेल यांनी भाजपात तर मालाड कुरार व्हिलेजमधले भोमसिंह राठोड, कांदिवलीतील योगेश भोईर आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काँग्रेसचे काही नगरसेवक शिवसेना भाजपच्या संपर्कात आहे.

  काँग्रेसचे 2002 मध्ये 45 नगरसेवक निवडून आले होते. 2007 मध्ये काँग्रेसचे 75 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 52 नगरसेवक निवडून आले होते. पण यंदा काँग्रेसची स्थिती ढासळल्यामुळे काँग्रेसचे गड धोक्यात आल्याचे दिसत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.