Advertisement

'युपी'च्या निकालाने विरोधकांना जागा दाखविली - मुख्यमंत्री


'युपी'च्या निकालाने विरोधकांना जागा दाखविली - मुख्यमंत्री
SHARES

मुंबई - भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. "पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्व सामान्यांनी जो विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाचा हा विजय आहे. देशाचा मूड काय आहे ते उत्तर प्रदेशमध्ये लागलेल्या निकालाने अधोरेखित केले आहे. आजच्या नवयुगावर देशाचा विश्वास आहे. हे युग देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

"नोटांबंदीचा त्रास सर्वात जास्त सर्वसामान्यांना झाला. मात्र तरीही लोकांनी भाजपाला साथ दिली आणि नोटांबदीला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली," असेही ते म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर बनवण्याचा सल्ला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "संजय राऊत यांना माहीत नसेल की तिथे राम मंदिर आहे. आम्ही भव्यदिव्य राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाच्या अजेंडयावर नेहमीचं राम मंदिर आहे."

शेतकरी कर्जमाफीबद्दल भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "2008 मध्ये कर्जमाफी करण्यात आली. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. 2012 मध्ये तर सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यावेळी कर्जमाफी केल्याचा फायदा बँकांना झाला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्य सरकार काम करत आहे," असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा