भारताच्या फाळणीला जबाबदार असलेले पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जीना यांचा मलबार हिल येथील बंगला आता इंटरनॅशनल सेंटरमध्ये रुपांतरीत होणार आहे. परराष्ट्र मंत्रालय (MEA) बंगल्याचा लवकरच ताबा घेणार असून यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे.
हैदराबाद हाऊसप्रमाणे जीन हाऊसचा वापर देखील उच्चस्तरीय परदेशी पाहुणे, प्रतिनिधीमंडळासोबत चर्चा करण्यासाठी करण्यात येईल. याआधी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी जीना हाऊस तोडून त्याजागी सांस्कृतीक केंद्र बनवण्याची मागणी केली होती.
लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीना हाऊस परराष्ट्र मंत्रालयाच्या ताब्यात देण्यास मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान कार्यालया (PMO)कडून जीना हाऊसचं नूतनीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पत्राद्वारे दिली आहे.''
सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी एरिया म्हणून ओळख असलेल्या मलबार हिल परिसरात जीना यांनी १९३६ मध्ये हा बंगला बांधला होता. त्यावेळेस हा बंगला बांधण्यासाठी त्यांना २ लाख रुपये खर्च आला होता. साऊथ कोर्ट असं या बंगल्याचं जुनं नाव होतं. इंडो गाॅथिक शैलीत बनवण्यात आलेला हा बंगला २.५ एकर जागेवर बांधण्यात आला आहे.
हेही वाचा-
शिवसेनेच्या नेत्यांनाच घरं कशी लागतात? निलेश राणेंचा आरोप, न्यायालयात जाणार
२३ जानेवारीपर्यंत मेगाभरती नाही, उच्च न्यायालयात सरकारचं प्रतिज्ञापत्र