Advertisement

मोदींनी बांधलेला पुतळा बंद, पण नेहरूंनी बांधलेली रुग्णालयं २४ तास खुली- जितेंद्र आव्हाड

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला

मोदींनी बांधलेला पुतळा बंद, पण नेहरूंनी बांधलेली रुग्णालयं २४ तास खुली- जितेंद्र आव्हाड
SHARES

देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेला आहे. या संसर्ग रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने मोदींना गुरूवारी रात्री प्रसार माध्यमांद्वारे जनतेला मार्गदर्शन केले. त्यावेळी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांधलेला सगळ्यात मोठा पुतळा ३१ मार्चपर्यंत बंद आहे. मात्र पंडित नेहरूंनी उभारलेली रूग्णालये संकटाच्या काळात २४ तास सुरू असल्याचे त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. 


पंतप्रधान मोदींच्या भाषणात सातत्याने नेहरूंचा उल्लेख होतो. देशातील अनेक घटनांना नेहरू कसे जबाबदार आहेत असं ते अनेक वेळा आपल्या भाषणांमधून सांगत असतात. त्याच पार्श्वभूमीवर नेहरूंना उद्देशून मोदींवर काँग्रेस समर्थकांकडून टीका करण्यात येत आहे. नेहरूंवर टिका करण्याची कोणतिही संधी मोदी सोडत नाही. मात्र देश आज अडचणीत असताना मोदींनी कोट्यावरधी रुपये खर्च करून उभा केलेला गुजरात मधील पुतळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे नेहरूंनी त्यांच्या काळात उभी केलेली  रुग्णालय कठीण परिस्थितीत नागिकांच्या सेवेसाठी खुली असल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 हेही वाचाः-Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये यासाठीकेंद्र आणि राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. अनेक संस्थांना ३१  मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागलं आहे. दरम्यान, सध्या देशभरातील सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळ देखील बंद करण्यात आली आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाची परिस्थिती सांगताना नेहरूंचा दाखला देत मोदींना टोला लगावला आहे.

हेही वाचाः-Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा