Advertisement

न्यायपालिका स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा फैसला उद्या : संजय राऊत


न्यायपालिका स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा फैसला उद्या : संजय राऊत
SHARES

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल गुरुवारी (उद्या) सकाळी लागणार आहे. तसे संकेतच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत.

तत्पूर्वी राजकीय वर्तुळातून या निकालावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही निकालापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. 

देशात लोकशाही आहे की नाही, देशातल्या विधानसभा आणि संसद या संविधानानुसार काम करतायेत की नाही तसेच न्यायपालिका स्वतंत्र आहे? की कुणाच्या दबावाखाली काम करतीये, याचा उद्या फैसला होणार आहे, असं मोठं वक्तव्य करत निकाल आमच्याच बाजूने लागेल असे जे दावा करतायेत त्याचा अर्थ त्यांनी गडबड केलीये, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल, या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल.

पाकिस्तानात त्यांचं संविधान जळताना दिसतंय. आपलं दुश्मन राष्ट्र जरी असलं तरी आज तो देश जळतोय, कारण देश संविधानानुसार चालत नाही. कायद्यानुसार आणि संविधानुसार भारत चालणार की नाही, याचा फैसला उद्या होणार आहे, असं राऊत म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचे कार्यक्षेत्र अशा सगळ्या मुद्द्यांवर गेली साडे आठ महिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती.

पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतले. घटनापीठातील एक न्यायमुर्ती १५ मे रोजी निवृत्त होत असल्याने उद्याच निकाल लागणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलंय. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा