Advertisement

‘या’ काँग्रेस नेत्यांकडून जीवाला धोका, कर्नाटकातील बंडखोर आमदारांचं पोलिसांना पत्र

काँग्रेसच्या काही नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबईतील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांनी पवई पोलिसांना लिहिलं आहे.

‘या’ काँग्रेस नेत्यांकडून जीवाला धोका, कर्नाटकातील बंडखोर आमदारांचं पोलिसांना पत्र
SHARES

काँग्रेसच्या काही नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबईतील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांनी पवई पोलिसांना लिहिलं आहे. या पत्रामुळे बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

अस्थिरता कायम

सत्तास्थापनेपासूनच दोलायमान स्थितीत असलेलं कर्नाटक सरकार सध्या संकटात सापडलं आहे. काँग्रेसच्या १३ आणि जनता दल (एस) च्या ३ अशा १६ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यापैकी २ बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात काँग्रेसला यश मिळालं असून उर्वरीत बंडखोर आमदार अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याचं दिसत आहे.

राजीनाम्यावर ठाम

त्यामुळेच मन वळवण्यासाठी पडद्यामागून हालचाली करणाऱ्या काँग्रेस नेत्यांपासून जीवाला धोका असल्याचं पत्र या बंडखोर आमदारांनी पवई पोलिसांना लिहिलं आहे. पवईमधील रेनीसान्स हाॅटेलमध्ये १४ बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. या पत्रात आमच्या जीवाला धोका असल्याने काँग्रसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य कोणत्याही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नेत्यांशी आम्ही चर्चा करणार नाही, असं पोलिसांना म्हटलं आहे.    

पुढची सुनावणी

कर्नाटक विधानसभा विधानसभा अध्यक्ष जेडीएस आणि काँग्रेसच्या आमदारांनी दिलेले राजीनामे मंजूर करण्यास टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.  हेही वाचा-

कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात

'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणारRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा