Advertisement

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ‘या’ १२ विषयांवर झाली चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली.

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या बैठकीत ‘या’ १२ विषयांवर झाली चर्चा
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.

या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बैठकीतील मुद्दे मांडले.

राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी मा. पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित  चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते  सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या भेटीत कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 

हेही वाचा- आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

पंतप्रधानांसोबत पुढील विषयांवर चर्चा झाली:
  • एसईबीसी मराठा आरक्षण
  • इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
  • राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
  • पिक विमा योजना : बीड मॉडेल
  • बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा