राजकारण झालं, देणीही मिळणार?

वांद्रे - खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी गुरुवारी थेट मातोश्रीचं दार ठोठावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीला खंबाटाचे कामगारही उपस्थित होते. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा थेट आरोप अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याचं समजतं. तर दुसरीकडे ही बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचं थकित वेतन तातडीनं देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले. त्यामुळे देणी मिळतात का, मिळाली तर कधी मिळतील असे प्रश्न या कामगारांना पडले आहेत.

Loading Comments