Advertisement

"EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाही", राहुल गांधींचा घणाघात

शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

"EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाही", राहुल गांधींचा घणाघात
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज (रविवारी 17 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा पार पडली. या सभेला देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. 

"ईडी, इन्कम टॅक्स, ईव्हीएम यांचा धाक राजकीय नेत्यांना दाखवला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक हे भीतीमुळे पक्ष सोडून गेलेत. जेलची भीती दाखवून घाबरवलं जात आहे. मोदी हा शक्तीचा मुखवटा आहे. 56 इंचाची छाती नाही, ती व्यक्ती अतिशय पोकळ आहे.  EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाही", असा घणाघात राहुल गांधींनी केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी केला. 

"हिंसा, महागाई, तरुणांच्या समस्यांवर बोलणे आवश्यक"

"गेल्यावर्षी आम्ही कन्याकुमारीपासून यात्रेची सुरुवात केली. आम्हाला यात्रा करावी लागली. मी काही वर्षांपूर्वी याचा विचारही केला नसता.  सोशल मीडिया, मीडिया हे देशाच्या हातात नाही. हिंसा, महागाई, तरुणांच्या समस्या हे मुद्दे मीडियात पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली, कारण दुसरा कोणताही उपाय नव्हता. फक्त राहुल गांधींनी ही यात्रा केली, अशा समजात राहू नका. कारण उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव हे देखील या यात्रेत सहभागी झाले.

"राजाचा जीव ईव्हीएममध्ये"

ते पुढे म्हणाले की, आम्ही मोदींच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात लढत नाही. हिंदू धर्मात एक विशिष्ट शक्ती असते, त्या शक्तीविरुद्ध आम्ही लढत आहोत. काही वेळापूर्वी कोणीतरी म्हटले की राजाचा जीव ईव्हीएममध्ये अडकलाय. ईडी, इन्कम टॅक्स, ईव्हीएम यांचा धाक राजकीय नेत्यांना दाखवला जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक हे भीतीमुळे पक्ष सोडून गेलेत. जेलची भीती दाखवून घाबरवलं जात आहे. मोदी हा शक्तीचा मुखवटा आहे. 56 इंचाची छाती नाही, ती व्यक्ती अतिशय पोकळ आहे.  EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकू शकत नाही."

"माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही"

"मी जेव्हा भारत जोडो यात्रा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ती मणिपूरपासून सुरु करायची हे निश्चित होते. त्याचा शेवट हा मुंबईतील धारावीत करायचा हे ठरवले होते. कारण धारावी ही कलेची, कुशलतेची राजधानी आहे. मी कित्येक वर्षांपासून सत्तेत आहे. मला व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असेही राहुल गांधी म्हणाले. 



हेही वाचा

Lok Sabha Election 2024 Date : मुंबईत 'या' तारखेला मतदान होणार

महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा