Advertisement

Lok Sabha Election 2024 Date : मुंबईत 'या' तारखेला मतदान होणार

मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार, जाणून घ्या तारीख

Lok Sabha Election 2024 Date : मुंबईत 'या' तारखेला मतदान होणार
SHARES

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. 

लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 ) इथे निवडणुका होणार आहेत. 

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे. 

पहिला टप्पा - 19 एप्रिल

दुसरा टप्पा - 26 एप्रिल

तिसरा टप्पा - 7 मे 

चौथा टप्पा - 13 मे  

पाचवा टप्पा - 20 मे

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान

Lok Sabha Election 2024 Dates LIVE : पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ - 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )



हेही वाचा

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा