Advertisement

शिवसेनेशी जुळवून घेतलेल्या पूनम महाजन पुन्हा येतील का निवडून ?


शिवसेनेशी जुळवून घेतलेल्या पूनम महाजन पुन्हा येतील का निवडून ?
SHARES

२०१४ साली आलेल्या मोदी लाटेवर स्वार होत भाजपाच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव करत लोकसभा गाठली. भाजपाचा युवा चेहरा असलेल्या पूनम महाजन यांच्याकडे भाजयुमोच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. याव्यतिरिक्त त्या बास्केटबॉल फेडरेशनच्या अध्यक्ष असून या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कारही देण्यात आला आहे.

राजकीय कारकीर्द

२००६ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी राजकारणात प्रवेश केला. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या राजकारणाची पायरी चढल्या. मनसेचे तत्कालीन उमेदवार राम कदम यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. परंतु त्यांना परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी प्रिया दत्त यांच्या विरोधात उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांनी प्रिया दत्त याचा पराभव केला. यावेळी भाजपाने पुन्हा एखदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

समजासेवक म्हणूनही ओळख

पूनम महाजन यांची राजकारणा व्यतिरिक्त एक समाजसेवक म्हणूनही ओळख आहे. निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्या पुढाकार घेताना दिसतात. याव्यतिरिक्त त्यांनी स्वच्छ भारत या अभियानातही सहभाग घेतला होता. महिलांचे अधिकार आणि महिलांच्या शोषणाविरोधातही त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.

अनेकदा चर्चांमध्ये

पूनम महाजन यांच्याविरोधात आजवर कोणताही आरोप करण्यात आला नाही. परंतु व्यतिरिक्त त्या चर्चेत आल्याचं पहायला मिळालं. आपल्या वडिलांचे आवडते गायक असलेले पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं. तसंच एका कार्यक्रमादरम्यान लहानपणी आपलं लैगिक शोषण झाल्याचं सांगत खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे अनेकदा उत्तर भारतीयांच्या बाजूनं बोलून त्यांनी इतरांचा रोष ओढवून घेतला होता.


#MLviews

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता. दरम्यान कॉग्रेसनं पुन्हा एकदा प्रिया दत्त यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळं पूनम महाजन  पुन्हा एखदा विजयी होणार का याची उत्सूकता नागरिकांना लागून राहिली आहे. 



हेही वाचा -

पराभवाची चव चाखलेले संजय दिना पाटील राखतील का राष्ट्रवादीचा मान?

मुकेश अंबानींच समर्थन मिळालेले मिलिंद देवरा ठरतील का मतदारांचे योग्य उमेदवार?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा